Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर, मात्र कृती नाही ; शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Sandip Kapde

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणांवर देखील टीका केली. राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली गेली, मात्र त्यावर कृती दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

शेवटी काळ्या आईशी जो ईमान राखतो...

राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली गेली, मात्र त्यावर कृती दिसत नाही. काल विदर्भात असताना एक गोष्ट लक्षात आली. मागील अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी जी नुकसान भरपाई जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. ही चांगली गोष्ट नाही. शेवटी काळ्या आईशी जो ईमान राखतो, लोकांच्या भुकेचा जो प्रश्न सोडवतो त्याला संकटाच्या काळात शासनाने मदत केली पाहिजे. बळीराजाचा हा आग्रह काही चुकीचा नाही. त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखे लोक निश्चित करतील, असे शरद पवार म्हणाले.

दुधाची किंमतीवर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा आहे. तसेच जिथे जिराईती शेती आहे तिथे दुधाचा व्यवसाय हा त्या कुटुंबाचा संसार चालवतो. दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते अजिबात योग्य नाही. यासाठी मी स्वत: राज्य सरकारशी विचारविनिमय करून त्यांना यातून मार्ग काढण्याची विनंती करणार आहे.

सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज-

राज्यात होणाऱ्या दंगलीवर शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घ्या.

शासकीय यंत्रणा विशेषतः पोलिस यंत्रणा जी पावले टाकते त्या यंत्रणेला सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सर्वांनी यंत्रणेला सहकार्य केले तर परिस्थिती तातडीने बदलली असे चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर अथवा अन्य शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी शांतता निर्माण केलीच पाहिजे, असे शरद पावर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT