Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray: बाळासाहेबांचे विचार आमच्या मनात; मुख्यमंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना माननारे शिवसैनिक आहोत.

सकाळ डिजिटल टीम

सत्तसंघर्षानंतर राज्यात शिवसेना कोणची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर सुप्रिम कोर्टात सुनावणीदेखील सुरू आहे. अशातच शिवसेना आमचीच असे ठाम मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आमच्या मनात अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. (Shiv Sena maharashtra politics CM Eknath Shinde Balasaheb Thackeray Death Anniversary)

साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात... वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख स्वर्गीय #बाळासाहेब_ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..अशा आशयाचे ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले आहे.

एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाने अनेकवेळा हा शिंदे गट नाही तर बाळासाहेबांची शिवसेना आहे. असे ठामपणे सांगितले आहे. राज्यात परिवर्तनाची गरज आहे. आम्ही परिवर्तन केले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना माननारे शिवसैनिक आहे. आम्ही आनंद दिघेंच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आहोत. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकवेळा जनतेला संबोधित करताना सांगितले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT