MLA Disqualification Case 
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाच्या 'या' आमदारांची होणार उलट तपासणी

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. दरम्यान या आमदार अपात्रता प्रकरणात लवकरच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली जाणार आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आपली साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे हे पुरावे सादर करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता आणि त्यानंतर 24 नोव्हेंबरला साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे.

आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर, उदय सामंत ,दिलीप लांडे ,योगेश कदम, भरत गोगावले आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची उलट तपासणी परत साक्ष नोंदवली जाईल ज्यामध्ये ठाकरे गटाची वकील त्यांना प्रश्न विचारतील

तर दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आणि रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या इतर पाच आमदार आणि खासदारांना सुद्धा विविध मुद्द्यांवर प्रश्न व उप प्रश्न ठाकरे गटाचे वकील करतील

अपात्रतेबाबत विधीमंडळत सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून भरत गोगावले आणि मंत्री दिपक केसकर यांची फेरसाक्ष होणार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्याच पद्धतीने शिंदे गटाकडून उदय सामंत, दिलीप लांडे यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार आहे. अपात्रतेबाबत सुनावनींचा आजचा पाचवा दिवस आहे. आजही शिवसेना उबाठा गटाचे प्रतोत सुनिल प्रभू यांची साक्ष नोंदवली जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT