Shiv Sena sada sarvankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : ''राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः विधानसभेच्या उमेदवारीवरुन झालेल्या नाराजीनंतर संजय राऊतांनी मला मनोहर जोशी यांचं घर जाळायला सांगितलं, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या आमदाराने केला आहे. एका जाहीर कार्यक्रमामध्ये मागे घडलेला घटनाक्रम त्यांनी सांगितला.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. ते म्हणाले की, आमदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी मला मनोहर जोशींनी 'मातोश्री'वर ताकद दाखवायला सांगितलं. पण नंतर माझी उमेदवारी कापली. जोशी सरांच्या घरावर हल्ला करण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकरांनी दिला होता, असं ते म्हणाले.

काय म्हणाले सदा सरवणकर?

ज्यावेळी मला उमेदवारी नाकारली तेव्हा मी मनोहर जोशींना काय करु, असं विचारलं. ते म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागले.. 'मातोश्री'वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी 'मातोश्री'वर गेलो. उद्धव ठाकरे बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत.

सरवणकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे तिथून निघून गेले. मिलिंद नार्वेकर तिथं होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी कापलेलं आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो. थोडं पुढे गेलो असेल तर संजय राऊतांचा फोन आला. मला म्हणाले कुठे चालले? त्यांना कशाला सांगायचं त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं दिली. सेना भवनाला चाललो वगैरे... ते म्हणाले, तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस.

''मातोश्री'चा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे मी मनोहर जोशींच्या घरी निघालो. तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात.. घराच्या आजूबाजूला काही व्हिडीओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून जे पुढे गेलो. त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती आहे.''

ही घटना सांगून आमदार सदा सरवणकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश दिले होते, असं सरवणकरांनी सांगितलं. याबाबत अद्याप ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

SCROLL FOR NEXT