Uddhav Thackeray: "शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री..."; उद्धव ठाकरेंचा निशाणा कुणावर?

Uddhav Thackeray: "शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री..."; उद्धव ठाकरेंचा निशाणा कुणावर?

Uddhav Thackeray: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावात जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी नाव न घेतो जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावरव टीका केली. संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राठोड यांना पुन्हा मंत्री करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा माझ्या एका मंत्र्यावर आरोप झाले, मी त्याला राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जायला लावलं होतं. आरोप भयानक होते. राजीनामा घेतला नसता तर शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील तोंड दाखविण्याच्या लायकीचा मी राहिलो नसतो. अरे तू काय करत आहेस, तुझ्या आजुबाजुला अशी माणसं बसली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोस? महिलांच्या संदर्भात गंभीर आरोप असलेल्यांना मंत्री म्हणून कायम ठेवतोस? असे प्रश्न बाळासाहेबांनी विचारले असते. हे मी कधीच सहन करु शकत नाही."

"छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट तुम्हांला माहित आहे ना? महिलांना देवता माननारे शिवाजी महाराज आणि अशा या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतोय. तिकडे मणिपू मध्ये जे झालं त्यावर तुमचे बापजादे काही बोलयला तयार नाहीत. कारवाई करत नाहीत, तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

Uddhav Thackeray: "शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री..."; उद्धव ठाकरेंचा निशाणा कुणावर?
Ajit Pawar : भला मोठा पुष्पहार अन् डीजेच्या दणदणाटात अजितदादांचं शिंदेवाडीत स्वागत; आमदार पाटील बनले उपमुख्यमंत्र्यांचे 'सारथी'

मी सत्तेसाठी धडपडतं नाहीये. संजय राऊत म्हणाले देशाचे नेतृत्व...फार मोठी गोष्ट आहे ही, मला अशी स्वप्न पडतं नाहीत, मी देशासाठी लढतोयं आणि तुमच्यासाठी लढतोय. इंडिया आघाडीची मध्यंतरी बैठक झाली, त्याच अध्यक्षपद आपल्याकडे होतं. देशातील सर्व मोठे नेते तिथे आले होते. माझा पक्ष यांनी चोरलेला, चिन्हं चोरलं तरी 'उद्धव ठाकरे' ला किंमत होती आणि आहे, ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

इंडिया म्हणून बैठक झाली त्यानंतर गद्दार आणि त्यांना गद्दारी करायला लावली त्यांनी होर्डिंग लावले. शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावला, 'मी शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही.' बरोबर आहे. पण शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही, अरे पंचवीस-तीस वर्षे सोबत असल्याने जशी शिवसेनेची भाजप झाली नाही तशीच शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. भाजप जेंव्हा मेहबुबा मुफ्तीं सोबत बसले होते तेंव्हा त्यांचा पीडीपी झाला होता का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Uddhav Thackeray: "शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री..."; उद्धव ठाकरेंचा निशाणा कुणावर?
Uddhav Thackeray : २५ वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, तशीच काँग्रेसही होणार नाही; ठाकरेंचं प्रत्युत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com