Maharashtra Political Crisis esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला गुवाहाटी पोलिसांकडून अटक

रुपेश कदम

आता गुवाहाटीतून एक मोठी बातमी समोर येत आहे.

दहिवडी (सातारा) : कोणाच्या ध्यानीमनी नसताना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवरील (Balasaheb Thackeray) श्रध्दा व शिवसेनेवरील नितांत प्रेमापोटी शिवसेनेचे साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख व कट्टर शिवसैनिक संजय भोसले (Sanjay Bhosale) हे थेट गुवाहाटीत पोहचले. त्यांनी हाॅटेल रॅडिसन ब्ल्यू येथे जावून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना उध्दव ठाकरेंकडे परत येण्याचं आवाहन केलं आहे. गुवाहाटी पोलिसांनी (Guwahati Police) त्यांना ताब्यात घेतलं असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली असून महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करणारे व त्यांचे समर्थन करणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या सगळ्या गदारोळात एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी माण तालुक्यातील बिजवडी गावचे रहिवाशी व साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले थेट गुवाहाटीत पोहोचलेत. एकनाथ शिंदे ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात थांबले आहेत, त्याच हॉटेलबाहेर संजय भोसले पोहोचले असून 'साहेब मातोश्रीवर परत चला' अशी आर्त साद त्यांनी एकनाथ शिंदेंना घातली आहे.

संजय भोसले यांनी आपल्या गळ्यात एक पाटी लावली असून त्यांनी एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं आहे. "शिवनसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या" असा मजकूर यावर लिहिलेला आहे. दरम्यान, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या संजय भोसले यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ माजली असून सर्वत्र संजय भोसले यांच्या नावाची चर्चा आहे.

कोण आहेत संजय भोसले?

बिजवडी (ता. माण) येथील संजय भोसले यांनी अतिशय तरुण वयात शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माण तालुकाप्रमुख व आता सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. सडेतोड भूमिका घेवून कोणालाही शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते. आजचे त्यांचे आंदोलन सुध्दा असेच असून ते गुवाहाटीत गेल्याची साधी कुणकुण सुध्दा शिवसैनिकांना नव्हती. या आंदोलनामुळे संजय भोसले चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT