महाविकास आघाडी सरकार पडतंय, त्याचं मला अजिबात दुःख नाही : राजू शेट्टी

Raju Shetty News on Government
Raju Shetty News on Government esakal
Summary

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी घडामोड घडलीय.

सांगली : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी घडामोड घडलीय. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळं महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 41 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचसोबत गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात नवा पेच निर्माण झालाय. (Raju Shetty News on Government)

दरम्यान, सेनेचे चाळीसपेक्षा जास्त आमदार सध्या एकनाथ शिंदे गटाकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. सध्या ते गुवाहाटीत आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी खरमरीत टीका केलीय. शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) पडतंय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण, आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण, हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही, हे स्पष्ट झालंय.

Raju Shetty News on Government
Shiv Sena : शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला गुवाहाटी पोलिसांकडून अटक

भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे, अशी टीकाही त्यांनी सांगलीत बोलताना केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com