Uddhav Thackeray Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : ''दोन-चार टकल्यांना घेऊन पक्ष मोठा होत नसतो'', एकनाथ शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे?

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यांना खोके पुरत नाहीत, यांना कंटेनर लागतात. त्याचा मी साक्षीदार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीकास्र डागलं.

संतोष कानडे

कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यांना खोके पुरत नाहीत, यांना कंटेनर लागतात. त्याचा मी साक्षीदार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीकास्र डागलं.

एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. रक्ताचं पाणी करुन घरावर तुळशीपत्र ठेवलं तेव्हा शिवसेना मोठी झाली. तुम्ही आले आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या. त्याही निट मारत्या आल्या नाहीत. असा कुठला पक्षाचा प्रमुख असोत का? आपल्याच नेत्याचा पानउतारा करायचा, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून व्यासपीठावरुन खाली उतरवायला लावलं. त्यांचं घर जाळायला माणसं लावली, हे कुणाचं कारस्थान. ज्याला ते काम सांगितलं, तो आपल्याबरोबर आहे.

''मी रामदासभाईंना सांगितलं. षण्मुखानंदमध्ये येऊ नका, तुमचाही मनोहरपंत करण्याचं चालू आहे. गजाभाऊ यांनाही कितीवेळा परत पाठवलं, हे त्यांना माहिती आहे. याच लोकांनी शिवसेना मोठी केली. हेच लोक बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत होते. नारायण राणे, राज ठाकरे यांना का घालवलं. दरबारी राजकारण करणाऱ्यांनी कारस्थान करुन नेत्यांना त्रास दिला.''

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, एखादा चांगलं भाषण करायला लागला तर त्याचं भाषण कट करायला लागतात. गुलाबरावांना त्याचा चांगला अनुभव आहे. आपल्याकडे असलेला माणूस चांगलं नेतृत्व सिद्ध करत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तरच पक्ष मोठा होत असतो. दोन-चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. सोडून गेलेले लोक सोबत ठेवले असते तर शिवसेनेची सत्ता अनेकवेळा महाराष्ट्रात राहिली असती. परंतु स्वतःचा पक्ष संपवायला निघालेला पक्षप्रमुख मी बघिताल नाही.

'त्यांना' कंटेनर लागतात- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांना खोके पुरत नाहीत कंटेनर लागतात. त्याचा सर्वात जास्त साक्षीदार मी आहे. धनुष्यबाण आपल्याला मिळाल्यानंतर त्यांचं एक पत्र आलं. आम्हाला पक्षाच्या खात्यातील ५० कोटी हवेत. मी क्षणाचाही विचार न करता देऊन टाका म्हटलं. ५० खोकेंचे आरोप करता आणि ५० कोटी मागता? यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. तुमच्यावरची संकटं ही या एकनाथ शिंदेने अंगावर घेतली आहेत. त्यामुळे बोलायच्या वेळी मी बोलणार, असा इशारा शिंदेंनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT