Supriya Sule Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : नेता फक्त पदाने नाही, कर्तृत्वाने मोठा होतो; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोला

मोठ्या पदावर असणारा नेता दिलदार असावा, असंही सुळे म्हणाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना आणि शिंदे गटातला दसरा मेळाव्याचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहे. दोन्ही गट आपणच शिवाजी पार्कवर मेळावा घेणार या मुद्द्यावर ठाम आहेत. या सगळ्यावर विविध पक्षांकडून मतं व्यक्त करण्यात येत आहेत. टीका टिप्पण्या होत आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात असतानाची एक आठवणही आज माध्यमांशी बोलताना सांगितली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला आठवतं, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन दिलदारपणे पवारांवर टीका करायचे. विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार?

मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या,"हा सगळा वाद दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री पद मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असायला हवं. आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा. आमच्याविरोधात भाषणं व्हायची. आम्हीही उत्सुकतेने आमच्या विरोधात ते काय बोलतात, हे ऐकायचो. त्यामुळे नेता हा फक्त पदाने मोठा होत नाही, तर तो कर्तृत्वाने होतो. त्यामुळे मोठ्या पदावर बसणारा नेता दिलदार असावा. त्यामुळे सध्या जे सुरू आहे, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT