Sanjay Raut  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ईडीनंतर आयटीची भानामती; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ईडी म्हणजे भाजपची एटीएम मशीन असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशात ईडीनंतर आयकर विभागाची भानामती सुरू असल्याचा घाणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केला आहे. ईडी म्हणजे भाजपची एटीएम मशीन असून, ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते शिवसेनाभवन येथे आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. (Sanjay Raut Corner BJP After ED & IT Raids In Maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून ईडीने छापेमारी केल्यानंतर आता आयटीची भानामती सुरू झाली असून, शिवसेनेच्या जवळच्या लोकांवर धाडी टाकल्या जात असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा, कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणीच धाडी टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, या धाडी केवळ महाराष्ट्र आणि बंगालमधील ठराविक लोकांना लक्ष्य करत केल्या जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

राऊत म्हणाले की, आतापर्यंत आम्ही आयटी आणि ईडीला 50 जणांविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, ईडीकडून फक्त सरकार पाडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलतान केला आहे. ईडीचे रॅकेट चालवणारे जितेंद्र नवलानी हे चालवत असल्याचेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

जितेंद्र चंद्रलाल नवलाल यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. एवढेच नव्हे तर, खंडणीतून वसूल केलेले हे पैसे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. ईडीचे एजेंट पैसे वसूल करत असून याबातची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली अससल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT