Sanjay Raut: मुंबई पोलिसांत तक्रार, ED अधिकारी जेलमध्ये जाणार

Sanjay Raut Live
Sanjay Raut LiveTeam eSakal

Sanjay Raut LIVE BLOG : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. राज्यात मागच्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल संजय राऊत यांनी देखील भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी यापूर्वीही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आपण काही मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय राहुल कनाल, अनिल परबांचे सी.ए. आणि आणखी काही लोकांच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे या धडीचं आणि केंद्रीय यंत्रणांच्या छाप्यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. (Shiv Sena Vs BjP)

कारवाई करण्याचे जसे अधिकार केंद्रीय यंत्रणांना आहे, तसे राज्याला सुद्धा आहेत, त्यामुळे ते नेमकी काय कारवाई करु शकतात हे काही दिवसात दिसेल असं सोमय्या म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांनी कितीही कारवाई केली, छापे टाकले तरी आम्ही घाबरणार नाही, शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते यांच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकत नाही असं राऊत म्हणाले. या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आम्हाला अटकही होऊ शकते असं राऊत म्हणाले.

देशातील सर्वात मोठा ईडीचा हा घोटाळा आहे. पुढच्या काळात आणखी काही घोटाळे आपण उघड करणार आहोत. यामध्ये कुणाला काय मिळालं हे सुद्धा सांगणार आहोत असं राऊत म्हणाले.

पिता-पुत्र जेलमध्ये जाणार; राऊतांचा सोमय्यांना इशारा

सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना वाधवान यांच्या निकॉन इम्फ्रामध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्या कंपन्यांवर सोमय्यांनी आरोप केले, त्याच कंपन्यांचे सोमय्या पार्टनर झाले. ज्या कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्यांच्यासोबत नील सोमय्या व्यावसायिक भागीदार कसे होऊ शकतात, याचं उत्तर भाजपचा कोणताच नेता देऊ शकत नाही. या प्रकरणात पिता-पुत्र जेलमध्ये जाणार असं राऊत म्हणाले.

सोमय्यांनी काही कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सोमय्या काही घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी करतात. सोमय्यांनी लिहीलेल्या कोणत्याच पत्रात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशीची मागणी केली होती. तेव्हा ते खासदार होते. लोकसभेत ते हा मुद्दा उपस्थित करु शकत होते. मात्र त्यांनी ते केले नाही.

खंडणी प्रकरणाचा तपास मुंबईत पोलिसांकडून सुरु झाला आहे. त्यामध्ये आता ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार असं आपण स्पष्ट सांगतो. ४ ईडीच्या अधिकाऱ्यांची पोलिसांवर तक्रार - राऊत

"जितेंद्र नवलानी हे ईडीचं रॅकेट चालवतात"

संजय राऊत यांनी ईडीच्या लोकांचा आणि सोमय्या यांचा काय संबंध आहे असं विचारत जीतेंद्र नवलानी हे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. जितेंद्र नवलानी हे ईडीचं रॅकेट चालवतात असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. या प्रकरणात आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून, ते आता चौकशी सुरु करणार आहे. राज्यात ईडीकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावण्याचं काम सुरु आहे असंही ते म्हणाले.

ईडीच्या लोकांना भाजपने तिकीट दिली आहे.

पंतप्रधानांना आम्ही २८ फेब्रुवारीला आम्ही पत्र दिलं. त्यामध्ये लिहिलं की, कचरा साफ करणं फक्त स्वच्छ भारतचा हेतू नाही. आता जे पत्र लिहिलंय तो फक्त एक भाग आहे. असे १० भाग आहेत.

भानामती जी सुरुय ती लवकरच बंद होईल. या धाडी कुणाच्या सांगण्यावरून होतायत याबाबत शिवसेना लवकरच खुलासा करेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

सरकार पाडण्यासाठीचं हे षडयंत्र आहे, आय़कर विभाग आणि ईडीला आम्ही ५० नावे पाठवली. पुराव्यांसह माहिती दिली तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. बंगाल आणि महाराष्ट्रतच सध्या छापेसत्र सुरु का आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आज सकाळपासून आमच्या काही लोकांवर कारवाई केली जातेय. आयटीची भानामती यावेळी सुरु आहे. बीएमसी निवडणुका होईपर्यंत हे छापे सुरु राहतील असं वाटतंय.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनीधींना काही कागदपत्र देखील यावेळी वाटण्यात आल्या आहेत.

काहीवेळापूर्वी त्यांनी एक ट्विट केलं आहे. "तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा.." आज 4 बजे शिवसेना भवन...असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com