Shiv Sena Symbol EC Hearing esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? या तारखेला होणार सुप्रीम कोर्टाची सुनावणी

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगविरोधात केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांनी बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबतचा वाद निर्माण झाला. अशातच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्याविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.(Latest Marathi News)

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.(Latest Marathi News)

त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर आता 31 तारखेला सुनावणी होणार आहे.(Latest Marathi News)

सत्तासंघर्षाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता.आता निवडणूक येऊ शकतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तातडीने सुनावणी करावी असं ठाकरे गटाने म्हंटलं होतं. तर या ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार का किंवा काही नवीन निर्देश यावेळी देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT