ShivSena 
महाराष्ट्र बातम्या

ShivSena: शिवसेना पक्ष, चिन्ह ठाकरेंना परत मिळणार का?, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिवाळीनंतर सुनावणी

Sandip Kapde

ShivSena: गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तापालट केला तेव्हा पक्षात दोन गट पडले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये पक्ष विभागला गेला. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

यानंतर खरी शिवसेना ओळखण्यासाठी उद्धव गट आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले. जिथे बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आम्ही पुढे नेत असल्याचे एकनाथ शिंदे गटाने सांगितले. तर उद्धव ठाकरे गट शिवसेनेवर आपला दावा सांगत होता. यानंतर शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण याबाबत उद्धव गट आणि शिंद गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

दरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आता दीवाळीनंतर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३१ ऑक्टोबर ला सुनावणी होणार होती मात्र. त्या दिवशी इलेक्ट्रोल बाँड बाबत दिवसभर सुनावणी होणार असल्यामूळे ती पुढे ढकलली होती.

या प्रकरणी अनेक महिन्यांपासून सुनावणी झाली नव्हती. आता २० तारखेला तरी सुनावणी होणार की दुसरी तारिख मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.

शिवसेना आता शिंदे गटाची आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे खरे नियंत्रक केले आहे. ७८ पानी निर्णयात निवडणूक आयोगाने विधानसभेपासून संघटनेपर्यंत शिंदे गटाकडे बहुमत असल्याचे म्हटले आहे. त्यांची पुष्टी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांचे दावे आणि कागदपत्रे आयोगासमोर सादर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT