shivsena Rajan Salvi security increased by cm eknath shinde sparked discussions maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: आणखी एक आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुरक्षा वाढवल्याने चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांची सुरक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढवली असून त्यांची सुरक्षा वाढवल्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. साळवी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुकवण्यात आली आहे. राजापूरलांजा विधानसभेचे आमदार असलेल्या साळवी यांची सुरक्षा वाढवल्याने साळवी हे शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राजन साळवी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजन साळवी यांच्यावर मेहरबाण का झाले? अशी चर्चा जोरात सुरू आहे.

एकनाथ शिंदे याच्या बंडानंतर आधी आमदार आणि नंतर खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती, त्यानंतर राज्यभरातून अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान या नंतर आता अंधेरी पोटनिवडणूकांवरून राज्यातील वातावर चांगलेच तापलेले दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडून तयार झालेले ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अंधेरीची जागा शिंदे गटाने युतीतील भाजपला सोडल्याने या निवडणूकीत ठाकरे गट विरूध्द शिंदे गट सामना पाहण्याची संधी हूकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT