Viral Video: मुख्यमंत्र्यांनी PM मोदींच्या शेजारी बसूनच खिशातून काढली पुडी अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivraj singh chauhan  was seen eating something secretly beside PM narendra modi video goes viral

Viral Video: मुख्यमंत्र्यांनी PM मोदींच्या शेजारी बसूनच खिशातून काढली पुडी अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री महाकाल लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी मंगळवारी 11 ऑक्टोबर रोजी उज्जैन येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील होते. त्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिवराज सिंह चौहान हे व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसून गुपचूप काहीतरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लोक मजेशीर कमेंट करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

या व्हिडिओमध्ये शिवराज सिंह चौहान हे पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसलेले आहेत, यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या खिशातून गूपचूप काहीतरी तोंडात टाकले, त्याच वेळी त्यांनी व्यासपीठावर भाषणासाठी निमंत्रीत करण्यात येते. त्यांचे नाव घेताच त्यांचा गोंधळ उडालेला व्हिडिओमध्ये दिसत आहे, ते इकडे तिकडे पाहायला लागतात, त्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्याशी काहितरी बोलताना दिसत आहेत.

दरम्यान पीएम मोदी आणि शिवराज सिंह यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्स तर असे म्हणत आहेत की पीएम मोदी इतके कडक आहेत की ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्यासमोर काहीही खायला देत नाहीत. त्याचबरोबर काही लोक शिवराज यांच्या कृतीची खिल्लीही उडवत आहेत.

हेही वाचा: Andheri Byelection: अजूनही वेळ गेलेली नाहीये! मोठं मन दाखवून निवडणूक बिनविरोध करा; ठाकरे गटाचं आवाहन

एका यूजरने लिहीले आहे की मामांचा न खाऊंगा न खाने दूंगा वर विश्वास नाही.. पाहा कसे मोदींची नजर चूकवून काजू खाल्ला.. सगळ्या एमपीमध्ये असे अनेक अधिकारी आणि मंत्री आहेत जे लपून-छपून खूप खातायेत...

हेही वाचा: Airtel 5G Plus vs Jio True 5G: कोणती कंपनी देतेय टॉप 5G स्पीड? येथे पाहा शहरांची यादी