Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस! निवडणूक आयोगातील नोंदीवरून पक्षात खडाजंगी

शिवसेना अपात्रता सुनावणीचा निकाल काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला. विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील १६ आमदारांना पत्र ठरवलं आहे

रोहित कणसे

शिवसेना अपात्रता सुनावणीचा निकाल काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला. विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील १६ आमदारांना पत्र ठरवलं आहे. कालच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.

2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. घटनादुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचे खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात आलं आहे.

घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले होते.

जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसकट घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर एंडोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी उद्धव ठाकरेंडकडे मागणी करण्यात आली. पण पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल तर देसाईंना याबद्दल जाब विचारण्यात यावा अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT