punyashlok ahilyabai holkar solapur university sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur University: विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना २० नोव्हेंबरपासून सुरवात

सकाळ डिजिटल टीम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरवात होणार आहे. शहर व जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर २०२३ पासून बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. शहर व जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या केंद्रावर या परीक्षा होणार असून सुमारे २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याची व्यवस्था ही परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. पदवीच्या परीक्षा पार पडल्यानंतर डिसेंबरमध्ये पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरवात होईल. त्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

एकूण तीन सत्रामध्ये परीक्षा होतील. याचबरोबर कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची देखील विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आले आहे.

यंदा पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे असेसमेंट (उत्तरपत्रिका तपासणी व मार्क अपलोड करणे) महाविद्यालय स्तरावर होणार आहे. मात्र वेळापत्रक जाहीर करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यापीठाकडूनच देण्यात येणार आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ज्या-त्या महाविद्यालयातच होणार आहे.

उत्तरपत्रिका तपासणी व मार्क विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे हे महाविद्यालय स्तरावर होणार असल्याने निकाल देखील लवकर जाहीर होणार असल्याचे प्रभारी परीक्षा संचालक डॉ. मलिक रोकडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT