Solapur News : कर्णकर्कश हॉर्नचा आरोग्यावर परिणाम; ध्वनी प्रदूषणाचीही डोकेदुखी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

सोलापूर शहरातील सर्वच प्रकारच्या गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नचा सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.
health effects of blaring horns deafness problem noise pollution headache traffic police
health effects of blaring horns deafness problem noise pollution headache traffic police sakal

Solapur News : सोलापूर शहरातील सर्वच प्रकारच्या गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नचा सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. चिडचिडेपणा वाढतो तर अनेकांना बहिरेपणा येत आहे. शहरात बहिरेपणाचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, वाहतूक पोलिस या प्रेशर हॉर्नकडे दुर्लक्ष करतात.

शहरातील रस्त्यांवरुन ये - जा करताना अनावश्यक हॉर्न वाजवत भरधाव दुचाकी, चारचाकी वाहने हाकली जातात. विशेषतः यात तरुण दुचाकीधारकांचे प्रमाण जास्त आहे. तर ट्रकसह चारचाकी वाहनांचे हॉर्न जादा डेसिबलचे असतात.

त्यांची मर्यादा ९३ ते ११२ पर्यंत आहे. मात्र, विशेषतः ट्रकचालक अनावश्यक खूप वेळ हॉर्न वाजवताना आढळतात. या कर्णकर्कश हॉर्नमुळे लोकांत चिडचिडेपणा वाढतो. रस्त्यावर अचानक वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नमुळे अन्य वाहनधारक विचलित होतात. यातून अपघात घडण्याचा धोकाही संभवतो. कारण बाजूने जोरात हॉर्न वाजवित वाहन गेल्यास वाहनधारक विचलित होऊन त्याचा गाडीवरील ताबा सुटू शकतो.

तसेच कर्णकर्कश आवाजामुळे मेंदूला त्रास झाल्याने चिडचिडेपणा वाढतो. आपल्या कामाचे नियोजन करुन घराबाहेर पडलेला वाहनधारकाला कामाच्या ठिकाणी पोचल्यावर मन एकाग्र होण्यास वेळ लागतो. परिणामी तो सहकारी, कुटुंबीयांवर चिडचिड करतो.

तसेच कर्णकर्कश हॉर्नसह सायलेन्सरमध्ये बदल करुन भरधाव वाहने हाकली जातात. शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर हे चित्र नेहमीचेच बनले आहे. त्यामुळे वाढत्या वायु प्रदुषणाच्या यादीत असलेल्या सोलापूर शहरातील ध्वनिप्रदूषणातही भर पडत आहे. शिवाय वाहनधारक व नागरिक बहिरेपणाचे शिकार होत आहेत. बहिरेपणाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, चौका-चौकात वाहतूक शिस्तीसाठी उभे वाहतूक पोलिस वाहने अडविण्यातच धन्यता मानतात. विनाकारण हॉर्न वाजवल्यास, मनाई भागात हॉर्न वाजवल्यास दंड आणि मल्टी साउंड, प्रेशर हॉर्न बसविल्यास व वाजविल्यास वाहनमालक आणि चालक अशा दोघांवर दंडात्मक कारवाईची मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे. परंतु, वाहतूक पोलिस कर्णकर्कश हॉर्नसह सायलेन्सरमध्ये बदल करुन भरधाव वाहन हाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात पोलिस पुढाकार घेत नसल्याचेच दिसते.

घटना दररोज, मात्र कारवाई कधीतरी

दोन दिवसांपूर्वी सात रस्ता - गांधीनगर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन आवाज करत गाडी हाकणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणावर कारवाई केली. मात्र, अशा घटना नित्याच्याच बनल्या असताना वाहतूक पोलिस त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. अशा कारवाया सातत्याने होणे आवश्‍यक आहे. गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण यायलच हवे.

वाहनांवरील हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अन्य वाहनधारक विचलित होतो. मेंदूला त्रास होऊन त्यांच्यात चिडचिडेपणा वाढतो. कामाच्या ठिकाणी मन एकाग्र होत नाही. त्यामुळे सहकाऱ्यांवर चिडतो. दिवसभरातील कामाच्या कोलाहलातून घरी परतताना हॉर्नचा कर्णकर्कश आवाज ऐकल्यास कुटुंबियांवर रागराग करतो. यातून तो आक्रमक होतो. विशेषतः ही बाब ट्रकचालकांमध्ये आढळते. कारण सतत कर्णकर्कश्श आवाजामुळे ते कोणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, हे अनेक घटनांमधून दिसून येते.

- मोहन बनसोडे, समाजसेवा अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

शहरात बहिरेपणाचे रुग्ण वाढले आहेत. वाहनांच्या कर्णकर्कश आवाज, सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या दुचाकींच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. ट्रकसह चारचाकी वाहनांचे हॉर्न जादा डेसिबलचे असतात. त्यांच्या आवाजाने बहिरेपणाच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनावश्यक हॉर्न वाजविल्याने वायुप्रदुषणातही भर पडते.

- डॉ. गिरीश हरकुट, कान, नाक व घसातज्ज्ञ, सोलापूर

मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक पोलिस नियमित कारवाई करतात. शहरात ठिकठिकाणी आवश्यक तेथे नेमलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना सातत्याने दिल्या जातात. त्यानुसार ते अनावश्यक हॉर्न वाजविणाऱ्या व सायलेन्सरमध्ये बदल करुन गाडी हाकणाऱ्‍यांवर कारवाई करत असतात.

- अजय परमार, सहायक पोलिस आयुक्त, परिवहन, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com