Sunil Kedar News sakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Kedar News : सुनील केदार यांना मोठा धक्का! जामीन अन् शिक्षेला स्थगिती नाहीच

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

रोहित कणसे

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सुनिल केदार यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. त्यामुळे सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना बुधवारी (ता.२८) रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला. यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्याच्या निकाल २२ डिसेंबरला देण्यात आला. निकालात पाच वर्षाची शिक्षा माजी आमदार सुनील केदार यांना ठोठावण्यात आली. याच दिवशी छातीत दुखत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

काँग्रेसचे नेते केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेसह १२.५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल तब्बल २२ वर्षांनंतर लागला आहे. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहा जणांना ही शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातून तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT