Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi : मला मोदींची काळजी वाटते; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सत्तांरांच्या बारामती दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Supria Sule On Abdul Sattar : अब्दुल सत्तार आज बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे बारकाईने पाहिले जात आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

दरम्यान, सत्तांरांच्या बारामती दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, जे कोणी बारामतीमध्ये येतात त्यांचे स्वागत आहे. कारण आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, राज्यातील एकनाथ आणि देवेंद्र म्हणजे ED सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ सामान्या व्यक्ती भरडला जातोय.

यावेळी त्यांनी नाशिक आणि नागपूर शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. याबाबत महविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. आमची अंतरिम चर्चा होईल वरिष्ठ नेते भेटतील असे म्हणत महविकास आघाडी कधीही गॉसिप करत नाही.

आमच्याबाबत बोललल्याशिवाय बातमी होत नाही

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार शंभुराज देसाईंच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे पार्थ पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून, या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणती बातमी होत नाही. त्यामुळे आमच्या बद्दल जे कोणी बोलत असतील तर ते ऐकून घेण्यास आम्ही दिलदार आहोत.

मोदींची काळजी वाटते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ग्राम पंचायत असो किंवा संसद निवडणूक मोदीजींना सर्वत्र ठिकाणी पळायला लागतं, त्यांची ही धावपळ पाहून मला त्यांची काळजी वाटते असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

सध्या भाजपजवळ नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती आता ती दिसत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT