Supriya Sule statement sunetra pawar 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात लढणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

कार्तिक पुजारी

मुंबई- २०१३-१४ मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण, त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. रिकॉर्ड चेक करुन पाहा, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या विषयावर संसदेत सर्वाधिक सूचना देणारी खासदार मी आहे, असं शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

धनगर समाजाच्या विरोधात भाजप आहे. आता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटलं आहे. ४० दिवसांत त्यांनी काय अभ्यास केला, काही सूचना केल्या आहेत का? लिंगायत आणि मुस्लिम समाजाबाबत तेच सुरु आहे. निवडणुका आल्या की यांची जुमलेबाजी सुरु होते. उद्धव ठाकरे म्हणतात ही भ्रष्ट जनता पार्टी आहे, पण पुढे जाऊन म्हणते की ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

आमच्यासाठी संसद हे मंदिर आहे. येथे आम्ही पारदर्शक चर्चा करतो. मी कायम धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संसदेत आवाज उठवला आहे. भाजप राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणते पण संसदेत बोलताना या आरक्षणाला विरोध करते. हे रिकॉर्ड चेक केल्यास समजेल, असं सुळे म्हणाल्या.राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीनिहाय आरक्षणाला पाठिंबा आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. यात सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू शकतं असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT