Supriya Sule WhatsApp Status
Supriya Sule WhatsApp Status Esakal
महाराष्ट्र

Supriya Sule WhatsApp Status: 'कितीबी समोर येऊदे....'; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत, का ठेवलं स्टेटस?

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडीयावर विविध पोस्टचा पाऊस पडत आहे. राज्यातील हाय व्होल्टेज लढत म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे आता स्पष्ट झाले असून दोन्ही बाजूंकडून प्रचाराला प्रारंभही झाला आहे. सुप्रिया सुळे या टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या स्टेटस, फेसबुकच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे.

आजही सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसला 'किती बी येऊ द्या त्यांना एकटा बास' हे गाणं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर ठेवलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे.

कितीही आले तरी त्यांना एकटे शरद पवार पुरेसे आहेत, असाच याचा अर्थ असून राजकीय मुत्सद्देगिरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हेच सगळ्यांना पुरून उरतील असाच संदेश या स्टेटस द्वारे सुप्रिया सुळे यांनी पोहोचविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT