Sushma Andhare 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : ...त्यालाही लायकी लागते; शिरसाटांच्या 'त्या' टीकेला सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

पुणे - शिवसेना पक्षात फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चुल थाटली होती. शिवाय आता शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. तर तिकडं ठाकरे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठं नाव ते म्हणजे सुषमा अंधारे आहेत. यावरून शिंदे गटाच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट करत अंधारे यांच्यावर टीका केली. त्याला अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करून म्हटलं की, संजय सिरसाट खोक्यांसाठी काहीही झालं असलं तरी राजकारणात प्रत्येक जण थोड्या बहुत शुचिता पाळून असतो असा माझा ठाम विश्वास आहे. परंतु तुमची आजची भाषा ऐकल्यावर लक्षात आले भाऊ म्हणून घ्यायला सुद्धा एक लायकी लागते..! ..अन मुख्यमंत्र्यांनी तुमची पुरती ओळखलेली आहे, अशा शब्दात अंधारे यांनी शिरसाट यांचा समाचार घेतला.

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय शिरसाठ यांनी खळबजनक दावा केला. ते म्हणाले की, त्या म्हणतात, सत्तारभाऊ माझेच भाऊ, भुमरेभाऊ माझेच भाऊ, काय-काय सुरू आहे. कोण आहेस तू? आमचं आयुष्य गेलं शिवसेनेत, आणि तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात, अस म्हणत, शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता टीका केली.

यावेळी ते म्हणाले, की मला अंबादासने फोन करून सांगितलं की, ती बाई लय डोक्याच्यावर झाली आहे. अर्थात, शिरसाट यांचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडेच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT