KCR  
महाराष्ट्र बातम्या

KCR : "...तर मी महाराष्ट्रात येणे बंद करेन" ; चंद्रशेखर राव यांचे थेट फडणवीसांना आव्हान

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सातत्याने पावले उचलत आहेत. थेट महाराष्ट्राच्या राजकारणात चंद्रशेखर राव आपल्या पक्षाच्या मुळा घट्ट करत आहेत. आज त्यांची नांदेड येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

चंद्रशेखर राव म्हणाले, महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये द्यावेत. शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज द्यावी. ज्या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते ते तेलंगणाप्रमाणे मोफत द्यावे.

एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याला ५ लाखांचा विमा सरकारने द्यावा. तेलंगणाप्रमाणे येथेही केंद्र उघडून सरकारने शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा. देवेंद्र फडणवीस तुम्ही या कामाचे आश्वासन द्या, मी महाराष्ट्रात येणे बंद करेन, असे आव्हान चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 

आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात बीआरएसची विशाल जाहीर सभा पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सहभागी झाले होते. बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील ही दुसरी सभा होती. महाराष्ट्रात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ते दानवेंना टक्कर देण्याची चर्चा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT