Yogesh Kadam Esakal
महाराष्ट्र बातम्या

Yogesh Kadam: आमदार योगेश कदमांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; कबुली देत म्हणाला...

कारला धडक देणाऱ्या डंपर चालकाची पोलिसांकडून चौकशी

सकाळ डिजिटल टीम

तीन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हद्दीत अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. या डंपरचा चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हा डंपरचालक आरोपी उत्तरप्रदेश येथील जनाडी बलिया गावातील आहे. अकलेश नरसिंग यादव असं त्याचं नाव आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्यामुळे ब्रेक लागला नाही. त्यामुळे माझा डंपरवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी कबुली अकलेश यादवने जबाबात दिली आहे.

हे ही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला ६ जानेवारीला रात्री १०.१५ च्या सुमारास पोलादपूर जवळील कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालक व दोन पोलीस या घटनेत जखमी झाले होते. रायगड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

या अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला होता. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघात होता की घातपात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT