Girish Mahajan : ...मात्र आमच्यासारखे पुढारी तुम्हाला माहित आहेत ; महाजनांनी सांगितला शिवसेनेतील बंडादरम्यानचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan : ...मात्र आमच्यासारखे पुढारी तुम्हाला माहित आहेत ; महाजनांनी सांगितला शिवसेनेतील बंडादरम्यानचा किस्सा

Girish Mahajan : ...मात्र आमच्यासारखे पुढारी तुम्हाला माहित आहेत ; महाजनांनी सांगितला शिवसेनेतील बंडादरम्यानचा किस्सा

Girish Mahajan : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. सुरुवातीला शिंदे गटाने उद्धव ठाकरे कुटुंबाविषयी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेतील बंडादरम्यानचा किस्सा सांगितला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन सुरुतमार्गे गुवाहाटी गाठले. या बंडामागे भाजपची मुख्य भूमिका होती. देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे जाहीरपणे सांगितले आहे. 

हेही वाचा: Urfi Javed Controversy: "गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं", उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

शिवसेनेतलं ऑपरेशन सोपं नव्हत, मात्र आमच्यासारखे पुढारी तुम्हाला माहित आहेत, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांना कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार बाहेर पडले, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: Indian Army : झोपलेले सैनिक अन् वरून बर्फाचा थर; Video पाहून थरकाप उडेल

गिरीश महाजन म्हणाले, ऑपरेशनला तर सुरुवात केली होती परंतू आम्हाला विश्वास बसत नव्हता. मात्र एकनाथ शिंदे निघालेत. पुढे गेले, बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं. एवढं सोपं नव्हत. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोक बाहेर पडत आहेत.  उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले. हे सोप नव्हतं परंतू लोक आलेत. 

हेही वाचा: Team India: भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे 24 तास! निवडकर्ते रोहित अन् विराटबाबत घेणार मोठा निर्णय