महाराष्ट्र बातम्या

...तर लोकसभा निवडणुक लढणार- धनंजय मुंडे

वृत्तसंस्था

मुंबई- 'पक्षाने जर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर पक्षाचे आदेश पाळून मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे' असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. परंतु, आपण विधानसभा निवडून लढवण्यासाठी इच्छूक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलत होते.

पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेली नाही. ज्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांचा अहवालाच आजपर्यंतच आलाच नाही' असा खुलासाही धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर, मी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. परंतु, आतापर्यंत एकाही मंत्र्यांने माझ्यावर मानहानीचा दावा केला नाही. तोडपाणीचा आरोप करायचा असेल तर ते सिद्ध करून दाखवा, तुमच्याकडे सत्ता आहे आणि तुम्ही चौकशी करा, मी त्यासाठी तयार आहे' असे थेट आव्हानही मुंडे यांनी सरकारला यावेळी दिले.

तसेच, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे तुम्ही राजकारण करतात या आरोपावर मुंडे यांनी बोलताना म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे हे माझे काका होते. सीबीआयचा अहवाल आला त्यात हा अपघात असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे तो मान्य करणे साहजिकच आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांवर त्यांचे समाधान झाले नाही. चार वर्षात केंद्रीय मंत्री गेले, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे की, धडक देणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे. यात कुणाला तरी शिक्षा झाली पाहिजे होती ना? चार वर्षांत न्यायालयात काही झाले नाही. त्यांच्या पीएची ड्रायव्हरची चौकशी का झाली नाही?' असा प्रश्नही यावेळी मुंडेंनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT