udayanraje bhosale
udayanraje bhosale esakal
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : आता आपल्या परीने बघून घेऊ; BJP वर हल्लाबोल करत उदयनराजेंनी ठरवली रणनिती

सकाळ डिजिटल टीम

रायगड - मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून आणि भाजपशी निगडीत लोकांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात येत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्यांनी राजगडावर आयोजित आक्रोश मेळाव्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आपली पुढील रणनिती ठरवली आहे. (Udayanraje Bhosale news in Marathi)

उदयनराजे म्हणाले की, पूर्वीच्या काळी देश मुघलांच्या तावडीत होता. आता पुन्हा देश विकृत लोकांच्या हातात गेलाय, हे सांगताना खंत वाटते. शिवाजी महाराजांनी विकृतांच्या हातातून देश बाहेर काढला. आता तुम्हीच लोक लोकशाहीचे राजे आहात. आता तुम्हीच यातून देशाला बाहेर काढू शकता, असंही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे पुढं म्हणाले की, सर्व राजकीय पक्ष स्वार्थी झाले. महाराजांनी सर्वधर्मियांना एकत्र केला. मात्र राजकीय नेत्यांकडून शिवाजी महाराजांविषयी तेढ निर्माण केली गेली. आता सर्वधर्मसमभावाचा विचार स्वार्थासाठी केला जातो. राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात. तर राज्याचे प्रमुख राज्यपाल असतात. त्या राज्यपालाचं मी नाव घेणार नाही. पण ते शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरून घालणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला. तसेच राज्यपालांच्या विधानावर आक्षेप न घेणारे देखील तेवढेच दोषी आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दरम्यान उदयनराजे आज भाजपमधून बाहेर पडतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र आज त्यांनी तशी काहीही घोषणा केली नाही. मात्र त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली असून पुढील आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे करणार असल्याचं सांगतानाच आता आपलं आपण बघून घेऊ, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT