Shraddha Murder Case : मी आधी तिचे हात कापले अन्...; आफताबने 'नार्को' टेस्टमध्ये उघड केला घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case : मी आधी तिचे हात कापले अन्...; आफताबने 'नार्को' टेस्टमध्ये उघड केला घटनाक्रम

नवी दिल्ली : दिल्लीच्या मेहरौलीमध्ये लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप असलेल्या आफताब पूनावाला याने नार्को टेस्टमध्ये हत्येचा घटनाक्रम उघड केला. नार्को टेस्टमध्ये आफताब पूनावालानं श्रद्धाच्या हत्येची कबुली तर दिलीच, शिवाय श्रद्धांच्या मृतदेहासोबत केलेल्या क्रुर कृत्याची माहिती दिली. (Shraddha Murder Case news in Marathi)

आफताबने सांगितलं की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात आधी तिच्या हाताचे तुकडे केले होते. त्यासाठी आपण चिनी शस्त्राचा वापर केला होता. आफताब पूनावाला पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी दोन्ही पूर्ण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या हाताचे आधी तुकडे केले. त्यासाठी त्याने चायनीज चाकूचा वापर केला. याच शस्त्राने त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. तसेच तिच्या हत्येनंतर श्रद्धाचा मोबाईल अनेक महिने आपल्याजवळ ठेवला होता. तसेच मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तेव्हा देखील श्रद्धाचा मोबाईल आपल्याकडेच होता. मात्र नंतर आपण श्रद्धाचा मोबाईल मुंबईतील समुद्रात फेकला.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

श्रद्धा वालकर हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावाला याची चौकशी शुक्रवारी नार्को टेस्टनंतर दोन तासांत पार पडली. आफताबच्या नार्को चाचणीनंतर चार सदस्यीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) पथक आणि तपास अधिकारी चौकशीसाठी दिल्लीतील तिहार जेलमध्ये दाखल झाले होते. पथके कारागृहात पोहोचल्यानंतर चौकशीचे सत्र सुमारे १ तास ४० मिनिटे चाललं.

टॅग्स :crimeDelhi crime news