Uddhav Thackeray Astrology esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Astrology : उद्धव ठाकरेंच्या हातून 2023 मध्ये जाणार मुंबई महापालिका?

आपल्या नेते मंडळींसाठी हे वर्ष कसं ठरणार, राजकारणात काय नवीन घडामोडी घडणार याचीही उत्सुकता अनेकांना असते.

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray Astrology : नवीन वर्ष आपल्यासाठी कसं ठरणार अशी उत्सुकता सगळ्यांनाच असते. तसंच आपल्या नेते मंडळींसाठी हे वर्ष कसं ठरणार, राजकारणात काय नवीन घडामोडी घडणार याचीही उत्सुकता अनेकांना असते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी 2022 हे वर्ष तसं तापदायकच ठरलं. सत्ता गेली. नंतर शिवसेना फुटल्याने पक्ष देखील हातून गेला. अनेक चांगल्या वाईट घडामोडींनी गाजवणारं हे वर्ष होतं. पण नवीन वर्ष कसं ठरणार याविषयी जाणून घेऊया. मुंबई महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण 2023 मध्ये हा राखला जाईल का याची शंका निर्माण होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) म्हणतात, "उद्धव ठाकरी यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या आयुष्यात 2024 पर्यंत संघर्ष आहे. येत्या नविन वर्षात त्यांनी राजकारणापेक्षा पक्ष संघटनेकडे विशेष लक्ष द्यावे. बाकी सरत्या 2023 नंतर त्यांचा काळ हा भाग्यकारक ठरेल. 2024 मध्ये ते पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतील."

"मात्र 2023 हे वर्ष त्यांच्यासाठी तितकेसे फायदेशीर नसून निराशाजनक आहे. महापालिका निवडणूकांमध्ये त्यांना पराजय पाहावा लागू शकतो", असेही ते सांगतात. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी 2023 या काळात फार महत्त्वपुर्ण निर्णय घेणे शक्यतो टाळावे. 2024 पर्यंत त्यांनी शांततेची भूमिका त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT