नारायण राणे, उद्धव ठाकरे google
महाराष्ट्र बातम्या

'मी असतो तर कानाखालीच चढवली असती', राणेंची जीभ घसरली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले. यावरूनच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली.

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. आज ही यात्रा कोकणात पोहोचली. यावेळी महाड येथील पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दहीहंडी संदर्भातील प्रश्न विचारला होता. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बोलताना राणेंची जीभ घसरली, ते म्हणाले, ''ज्यांना स्वातंत्रदिन कधी आहे हे माहिती नाही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. त्यांनी अपशगुन्यांसारखं बोलू नये. त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवून बोलावे. स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वतंत्र्यदिनाच्या माहिती नसावी, असे आक्षेपार्ह वक्तव्य नारायणे राणे यांनी केले.''

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT