राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ED कार्यालयात ; जाणून घ्या प्रकरण

 Praful Patel
Praful Patel sakal media

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel) यांनी सक्तवलुसी संचलनालयाच्या( Enforcement directorate) कार्यालयाला सोमवारी भेट (visit) दिली. सीजे हाऊस प्रकरणात (CJ house case) जप्त करण्यात आलेल्या मालमत्त्यांबाबतच्या (properties) कागदोपत्री (documents procedure) कार्यवाहिसाठी ते ईडी कार्यालयात आल्याची माहिती समजली आहे.

 Praful Patel
जागतिक वडापाव दिनानिमित्त डॉक्टरांनी दिला 'हा' महत्वाचा सल्ला

2019 मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले होते. त्यावेळी ईडीने त्यांची चौकशीही केली होती. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीमधील नेहरू तारांगणच्या समोर आहे.

याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असं ठेवण्यात आलं आहे. दरम्यान ईडीने सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथ मजला जप्त केला आहे. ही इक्बाल मिर्चीची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. याच प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारप्रकर झाल्याची देखील केस आहे. याबाबत मालमत्ता पडताळणी व त्याच्या स्वाक्षरीसाठी आपल्याला बोलवण्यात आल्याचे पटेल यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. यापूर्वी याप्रकरणी 16 आरोपींविरोधात आरोपपत्र 12 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com