Vidya Raghunath Ranbhor
Vidya Raghunath Ranbhor sakal
महाराष्ट्र

Motivation News : ‘देणाऱ्याने देत जावे...’

सकाळ वृत्तसेवा

- शैलेंद्र बोरकर

आजींचे ‘देणे’ गेली किमान २५ वर्षे आणि शब्दशः या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशाप्रकारे सुरू आहे. कोणाकोणाला काय दिले तेही त्यांनी लक्षात ठेवलेले नाही. कुठे चर्चा नाही, कुठे वाच्यता नाही.

सेवाभावी कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्था त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात अनेक चांगली कामे करत असतात. त्यांच्या कामांना बळ मिळत असते ते समाजातूनच. कार्यकर्त्यांना आणि संस्थांना बळ देणाऱ्या पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या विद्या रघुनाथ रणभोर यांची ओळख मुद्दाम करून द्यायला हवी. त्या मूळच्या जुन्नरच्या. विवाहानंतर पुण्यात आल्या.

पती आणि कुटुंबप्रमुख रघुनाथ ऊर्फ काका रणभोर लष्करात अकाउंट्स विभागात नोकरी करीत होते. रणभोर आजींना दोन मुली. आजींची जन्म १९२९मधील ९५ वर्षांच्‍या आजींची प्रकृती उत्तम आहे. त्या पूर्णतः स्वावलंबी आहेत. त्यांचा दिनक्रम सकाळी सहाला सुरू होतो.

व्यक्तिगत संसार अगदी काटकसरीचा होता, गरजाही मर्यादित होत्या. छानछोकीला, खोट्या प्रतिष्ठेला तर जीवनात स्थानच नव्हते. रणभोर काकांच्या अल्पशा पगारात संसार करताना, मुलींना वाढवताना, त्यांचे शिक्षण, विवाह हे सारे करताना आलेला आर्थिक भार या दाम्पत्याने कौशल्याने सांभाळला. नोकरीत ४६ वर्षांच्या सेवेनंतर काका निवृत्त झाले. निवृत्तीनंतर थोडे पैसे हाती आले.

थोडे, थोडे साठूही लागले. ही साठवण सुरू असताना १९९६ मध्ये दोघांच्याही लक्षात आले, की आपल्या गरजा पूर्ण होताना साधारण दहा हजार रुपये आपल्याकडे साठले आहेत. एखाद्या सामाजिक कामाला ही साठवण देणगीच्या रूपाने देण्याचा निर्णय दोघांनी एकमताने घेतला. त्यांनी मोठ्या आनंदाने वनवासी कल्याण आश्रम या संस्थेला एकहाती रक्कम देऊन टाकली.

आजींच्या जीवनातले पहिले देणे असे घडले. पुढे चार वर्षांनी काकांचे निधन झाले; पण हाताला लागलेली मदत देण्याची सवय रणभोर आजींनी जणू अंगी बाणवली. काकांच्या जाण्यानंतर फंड वगैरे जी काही रक्कम मिळाली होती ती आजींनी मुदत ठेवीच्या रूपाने बँकेत ठेवली होती. मुदत ठेवीमुळे ती हळूहळू वाढत असते. त्यांना थोडे निवृत्तिवेतन मिळते. आजींच्या गरजा खूपच कमी. त्यामुळे त्या गरजा थोड्या रकमेत भागतात. मग चार-सहा महिन्यांनी आजी एखाद्या संस्थेला साठलेले काही हजार रुपये देतात.

रणभोर घराण्याला आध्यात्मिक वारसा आहे. त्या संस्कारांमुळे आजींनी प्रथम आळंदीतील काही संस्थांना अशा देणग्या दिल्या, मग सज्जनगडच्या समितीला देणगी दिली, साकोरीच्या आश्रमाला निधी दिला. पुढे पैसे साठल्यानंतर वडगाव शेरीतील इंडियन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला, सुराज्य प्रकल्पाला, तळासरी आश्रमाला, कोल्हापुरातील पुरानंतर जे मदतकार्य झाले त्याला देणगी दिली. या आणि अशा कितीतरी सामाजिक संस्थांना, सामाजिक कामांना निधी देत आजींनी समाजऋणाची परतफेड केली आहे.

आजींचे जावई प्रदीप नाईक हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. ते रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आहेत. लेखकही आहेत. त्यांनी एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, काही एक रक्कम साठली की आजी अगदी लकडा लावतात की कोणती तरी संस्था सांगा. एकदा उपेक्षित आणि वस्त्यांमधील मुलांसाठी काम करणाऱ्या स्व-रूप वर्धिनी या संस्थेची माहिती मी आजींना दिली. दोन-तीन दिवसांतच आजी, मी आणि पत्नी सुधा असे तिघे संस्थेत गेलो.

कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आणि अगदी सहजतेने आजींनी संस्थाप्रमुखांकडे पन्नास हजारांची देणगी सुपूर्द केली. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर आजी पावतीसुद्धा नको म्हणाल्या. आजी म्हणतात, ‘आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. ती आजही आहे. म्हणून मग आपले व्यवस्थित होऊन जे उरते ते समाजासाठी देऊन टाकायचे असे मी ठरवले आहे. तेवढीच चांगल्या कामाला मदत.’

उपयुक्त शिकवण

सामाजिक आणि सेवाभावी कामांसाठी निधीच्या रूपाने मदत करत राहणे हे रणभोर आजींचे वैशिष्ट्य आहे. वर्तमानपत्राच्या वाचनाने त्यांची दिवसाची सुरुवात होते. महत्त्वाच्या बातम्यांवर जावई आणि लेकीबरोबर चर्चाही करतात. रोज भगवद्‍गीतेचे वाचन करतात. ग्रंथ आणि पुस्तकेही वाचतात. देण्याची शिकवण दोन्ही लेकींना, जावयांना, नात जावयांनाही त्यांनी दिली आहे. त्यानुसार तेही अनेक संस्थांना वेळोवेळी साहाय्य करीत असतात.

प्रेरणादायी हातांची गाथा

माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT