महाराष्ट्र बातम्या

इतिहास साक्षीला; राणे ज्या पक्षात जातील, त्या पक्षाचं पानीपत!

स्नेहल कदम

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेविषयी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही त्यावर पाणी सोडले आहे.

रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांविषयी (cm uddhav thackeray) चूकीचे वक्तव्य केल्यावर काय घडतं हे कालच्या घटनेवरून समजलं असेल. केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्य पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकवेळी पुढे जाण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यास कायद्याने अटकाव घालता येतो, हे कालच्या घटनने सिद्ध झाले असल्याची तिखट प्रतिक्रीया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नारायण राणे (narayan rane) यांच्यावर केली आहे. आज त्यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

जन आशीर्वाद यात्रेविषयी पुढे ते म्हणाले, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेविषयी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही त्यावर पाणी सोडले आहे. आम्हाला त्याची अजिबात भीती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा (jan aashirvad yatra) काढून ज्या ठिकाणी नारायण राणे जाणार, त्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के होणार आहे.

पुढे ते म्हणाले, राणे केंद्रीय मंत्री पदावर गेल्यामुळे आम्हाला बरं वाटलं. आजपर्यंत नारायण राणेंचा इतिहास आहे, ज्या पक्षांमध्ये राणे मंत्री होतात त्या पक्षाचं पानिपत होते. आणि हाच इतिहास पुन्हा एकदा भाजपला अनुभवायला मिळाला आहे यात आम्हाला आनंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT