...म्हणून नाशिक पोलिसांनी राणेंना अटक केली नाही, आयुक्तांनी सांगितलं कारण

Narayan Rane
Narayan Rane Sakal

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात (union minister narayan rane) नाशकात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक त्यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. ते पोहोचण्यापूर्वीच रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली होती. त्यानंतर महाड पोलिसांमध्ये राणेंना हजर करण्यात आले आणि रात्री त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना अटक का केली नाही? याबाबत नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी (nashik police commissioner) स्पष्टीकरण दिले आहे.

Narayan Rane
राणेंच्या घरात घुसून कोथळाच बाहेर काढतो, सेना आमदाराचा तोल ढळला

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केली होती. त्यानंतर या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राज्यभरात राडा घातला. त्यानंतर नाशिकमध्ये नारायण राणेंविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक रत्नागिरीकडे राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. तितक्यात पुणे आणि महाडमध्ये देखील गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक दाखल झालं. त्याबाबत बोलताना नाशिक पोलिस आयुक्त म्हणाले, 'जो गुन्हा दाखल झाला आहे, त्याची चौकशी करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदविला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. त्यानुसार नारायण राणे यांना २ सप्टेंबरची ताऱीख दिली आहे. तपासास सहकार्य करण्यास सांगितले आहे. याबाबत ते स्वतः सहकार्य करणार आहेत. अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असे त्यांनी लिहून दिले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही.'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरही नाशिक पोलिस आयुक्तांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे ज्ञान आहे. मात्र, माझ्या ज्ञानानुसार, ते आदेश चुकीचे असेल, तर ते आदेशाला आव्हान देऊ शकतात. माझे आदेश योग्य आहे. मी माझ्या आदेशावर अजूनही ठाम आहे, असे आयुक्त म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांना नाशिक पोलिसांकडून समन्स बजाविण्यात आला आहे. यानुसार त्यांना २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांत हजर राहून तपासासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे. त्याबाबत नारायण राणे यांनी सहमती दर्शवली असून ते हजर राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com