Narayan Rane sakal media
महाराष्ट्र बातम्या

राणेंची कुंडली आमच्याकडेही; शिवसेनेकडून गंभीर इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. एकीकडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या अटकेमुळे नारायण राणे यांनी शिवसेनेवर अधिक कठोर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही नारायण राणे यांच्यावर कडवट टीका करण्यास सुरुवात केली आहे. दोन्हीबाजूने सुरु असलेली ही राजकीय चिखलफेक आता वैयक्तिक वैरभावाकडे सरकत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. आपल्या ट्विटरवर त्यांनी म्हटलंय की, नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपाने सोडले आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. केवळ नि केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणे भाजपात सक्रीय झालेत. सक्रीय होत असताना त्यांनी शिवसेनेबाबत आणि स्वतःमध्ये असलेले वैशिष्ट्य ते सांगितले आहे !

पुढे त्यांनी म्हटलंय की, ही जी काही जनआशीर्वाद यात्रेची पुन्हा सुरुवात झालेली आहे ती लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी नाहीये. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो उद्देश होता त्या उद्देशाला सार्थ ठरवण्यासाठी ही यात्रा नसून केवळ नी केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि शांत असलेल्या कोकणामध्ये पुन्हा अशांतता निर्माण करायची आहे.

राणेंची कुंडली आमच्याकडे

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये नारायण राणेंची कुंडली मांडलेली. ती कुंडली आमच्या हातातही आहे. म्हणजे आम्हाला बाकी काय करायचे नाही. देवेंद्र फडणवीसांनी जे काही आरोप केले त्याची पुनःचौकशी करायची आहे, असंही राऊत यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुर्दैव आहे. भूताच्या हाती कोलीत दिल्यानंतर नरेंद्र मोदींचा भाजप नारायण राणे कसा जाळायला निघाला आहे याचा त्यांनी अभ्यास करावा.

अंकुश राणेंच्या खूनाबाबत गंभीर आरोप

विनायक राऊत यांनी अंकुश राणे यांच्या खूनाबाबत नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, अंकुश राणे जे होते ते नारायण राणे यांचे सख्खे चुलत भाऊ होते. त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावे. खून केल्यानंतर कोणत्या गाडीमध्ये घातले, कोणत्या ठिकाणी नेऊन तो जाळून टाकला हेही नारायण राणेंनी सांगावे. आमच्याकडे तो सुद्धा मोठा पुरावा आहे. शोधून काढू शकतो, असा इशारा राणेंना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT