काबूल बॉम्बस्फोट: इस्लामिक स्टेट खोरासनमध्ये केरळचे १४ जण

भारतासाठी धोक्याची घंटा.
Kabul Airport blast
Kabul Airport blast

काबुल: इस्लामिक स्टेट ऑफ खोरासनने (ISKP) गुरुवारी काबुलमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची (kabul blast) जबाबदारी स्वीकारली. जवळपास २०० जण या बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. यात १३ अमेरिकन नागरिकांचा (american citizen) समावेश आहे. काबुलमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट भारतासाठी (india) सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण केरळचे १४ रहिवाशी या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासनसाठी काम करत असल्याची माहिती आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवताच बागराम जेलमधून या १४ जणांना मुक्त केलं आहे. २६ ऑगस्टला काबुलमधील तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेरही स्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला. पण ते अयशस्वी ठरले. या संबंधात दोन पाकिस्तानीना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पण या वृत्तावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

Kabul Airport blast
शिवसेनेला राग आला नाही, तर त्यांनी तमाशा केला - आशिष शेलार

अफगाणिस्तानातून ज्या बातम्या येतायत, त्यानुसार काबूल हक्कानी नेटवर्कच्या नियंत्रणाखाली आहे. हक्कानी नेटवर्कमध्ये झाद्रान पश्तून आहेत. जलालाबाद-काबुलवर सुरुवातीपासूनच झाद्रान पश्तुनांचे वर्चस्व राहिले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नानगरहार प्रांतामध्ये झाद्रान पश्तुनांचे वर्चस्व आहे. इस्लामिक स्टेट खोरासन सुद्धा नानगरहारमध्ये सक्रीय आहे. आधी हक्कानी नेटवर्क आणि ISKP एकत्र काम करायचे.

Kabul Airport blast
ठाकरे अन् फडणवीसांची बंद दाराआड चर्चा? वाचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

बगरामच्या तुरुंगातून सुटलेल्या केरळच्या १४ जणांपैकी एकाने आपल्या घरी संपर्क साधला होता. उरलेले १३ जण ISKP च्या दहशतवाद्यांसोबत काबुलमध्ये आहेत. २०१४ मध्ये इसिसने इराकमधील मोसूल शहरावर ताबा मिळवला. त्यावेळी केरळच्या मल्लपुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातून काही तरुण भारताबाहेर जाऊन जिहादी गटांमध्ये सहभागी झाले. काही दहशतवाद्यांची कुटुंब ISKP च्या नियंत्रणाखाली असलेल्या नानगरहार प्रांतामध्ये स्थायिक होण्यासाठी आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com