Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता; या भागात 'यलो अलर्ट'

Weather Update : आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. या प्रणालीत मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती मिसळली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस कोसळला; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचा परिणाम पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला असून तापमानात चढ-उतार कायम आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळ असले; तरीही खेळत्या हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.

जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) दिवसभर प्रामुख्याने आकाश निरभ्र होते. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानही पाहायला मिळाले. दुपारी बहुतांश ठिकाणी हवा खेळती होती. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस; तर कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील आठवडाभर तरी संपूर्ण जिल्ह्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून सायंकाळी ढगाळ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या काळात उन्हाची तीव्रताही कायम राहणार आहे.

आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. या प्रणालीत मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती मिसळली आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांखाली आले आहे.

या भागात ‘यलो अलर्ट’

राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने गुरुवारी (ता. ११) विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

- लवळे, शिरूर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क : ४१.२

- पुरंदर, राजगुरुनगर, हडपसर, खेड, इंदापूर : ४०.१

- चिंचवड, शिवाजीनगर, पाषाण : ३९.५

- बारामती, तळेगाव, गिरवणे, हवेली : ३८.४

- आंबेगाव, दौड, भोर : ३७.८

- नारायणगाव, माळीण, निमगिरी : ३६.७

- लोणावळा : ३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT