Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहे. राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी ओसरली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात, कोकण गोवा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हवामान अंशतः ढगाळ होत आहे.

19 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 30 ते 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 1 किंवा 2 ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि ईशान्य भारतातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT