Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काय संबंध? स्थापनेवेळी ते...; शिंदे गटाचा सवाल

रवींद्र देशमुख

बुलडाणा - उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील आमदार अपात्रतेचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून रेंगाळला आहे. मात्र दोन्ही गटांकडून एकमेकांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा शिंदे ठाण्यात नगरसेवक होते. मग शिवसेना शिंदेंची कशी झाली? या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा उद्धव साहेब कुठे होते? उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, ते तर बाळासाहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते. उलट बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार दिला. मात्र त्यांनी पूर्ण शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली.

दरम्यान बाळासाहेब असते तर असं झालं असतं का? असे सांगत शिवसेना ही आमदार आणि खासदारांच्या मतांच्या जोरावर स्वतंत्र स्थापन झालेली आहे. मेरिटवर आमचा पक्ष स्थापन झाल्याचा दावाही संजय गायकवाड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT