Gunratna Sadavarte Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडणारे ते 3 जण कोण? मराठा आरक्षणासाठी जाळली होती स्वतःची कार

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्ते कोण?

मंगेश साबळे

वसंत बनसोडे

राजू सावे

या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

यामध्ये तोडफोडीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे, वसंत पाथ्रीकर यांच्यासह तिघांनी गाडीची तोडफोड करून एक मराठा लाख मराठा....छत्रपती शिवाजी महाराज की जय.. घोषणा दिल्या.

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे आणि त्यांचे सहकारी पाथ्री येथील वसंत पाथ्रीकर या दोघांचे मराठा आरक्षणासाठी सातत्याने एकापाठोपाठ आंदोलन सुरूच आहे. यापूर्वी मंगेश साबळे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने संतप्त होऊन स्वतःची नवी कोरी कार जळवून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. सोशल मिडीयावर त्यांचे स्वतःची कार पेटवून दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा, गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा

गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंना तातडीने अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती आहे.

या प्रकरणावर मनोज जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे म्हणाले, मला काहीच माहित नाही मी आता झोपेतून उठलो. मराठा शांततेत आंदोलन करत आहे. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

Farmer Loan Waiver: दोन लाख शेतकरी पहिल्या यादीत; कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य

NEET Exam Vijay Thalapathy : भविष्यात 'नीट' परीक्षा होणार नाही? विजय थलपतींनी मांडला तामिळनाडू पॅटर्न; 'वैद्यकीय शिक्षणाचे अधिकार राज्यांना द्या'

नीटचा पेपर फुटला, पुतण्या उपचार घेतोय, आंदोलनात पुतणीला मारहाण; भाजप नेत्यानं राजीनामा दिल्याची पोस्ट व्हायरल

Live Updates Marathi : दिल्लीत मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचले

SCROLL FOR NEXT