sunil deodhar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Deodhar: कोण आहेत सुनिल देवधर? पुणे लोकसभेसाठी भाजपकडून नाव चर्चेत

कार्तिक पुजारी

मुंबई- लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. लोकसभा निवडणुका आठ ते नऊ महिन्यांत लागू शकतात. त्यामुळे पुण्याच्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. पुण्याच्या जागेसाठी अनेक उमेदवार इच्छूक आहेत.

पुण्याच्या जागेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि दिवंगत भाजप नेते गिरीष बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. पण, आणखी एका नावाचा विचार भाजप करत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या नावाचा विचार भाजप गांभीर्याने करत असल्याचं कळतंय. सुनिल देवधर स्वत: या जागेसाठी इच्छूक असल्याची माहिती आहे. सुनिल देवधर हे गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे असल्याचं मानलं जातं. त्रिपुरामध्ये २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या प्रभावाला खिंडार पाडून तेथे भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

सुनिल देवधर कोण आहेत?

सुनिल देवधर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९६५ मध्ये पुण्यामध्ये झाला आहे. मराठी पत्रकार वी ना देवधर यांचे ते सुपुत्र आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात त्यांनी १२ वर्षे काम केले आहे. 'माय होम इंडिया' नावाची त्यांची एनजीओ आहे. ईशान्य भारतातील लोकांच्या मदतीसाठी आणि उर्वरित भारताला त्यांच्याशी जोडण्यासाठी त्यांनी ही एनजीओ सुरु केली होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ते कॅम्पेन मॅनेजर होते. या मतदारसंघातून पंतप्रधान मोदी यांचा दणदणीत विजय झाला होता.

आयुष्यातील अनेक वर्षे त्यांनी ईशान्येतील राज्यांसाठी दिले आहेत. त्यांचा तेथील स्थानिक जमातींशी चांगला संपर्क आहे. २०१८ साली त्रिपुरामध्ये भाजपने शून्य जागांवरुन बहुमताचा आकडा पाच वर्षात गाठला होता. या यशामध्ये मोठा वाटा सुनिल देवधर यांचा होता. त्यांनी त्रिपुरामघ्ये भाजपची संघटना बांधणी केली. याआधी २०१३ मध्ये भाजपच्या ५० जागांपैकी ४९ जागांवर अनामत रक्कम जप्त झाली होती.

राजकीय प्रवास

सुनिल देवधर ईशान्य भारतात संघाचे प्रचारक होते. १९९४ मध्ये ते शिलाँगचे प्रचारक होते. ते २००२ पर्यंत प्रचारक होते. देवधर यांची एनजीओ ईशान्य भारतातील ६५ शहरात काम करते. जेव्हा नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते, तेव्हा त्यांनी ईशान्य भारताच्या संपर्क सेलचा कॉन्सेप्ट पेपर बनवला होता. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना राष्ट्रीय संयोजक बनवण्यात आले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता.

२०१३ मध्ये देवधर यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती. याठिकाणी भाजपने १० पैकी सात जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना पालघरची जबाबदारी दिली होती. याठिकाणी सीपीएमची एकमेव जागा होती. याठिकाणी भाजपचा विजय झाला. त्यानंतर अमित शहांनी त्यांना ईशान्य भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी त्यांनी तरुणांवर लक्ष दिले. भाजपचा मोठ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT