Pune News : लोकसभेसाठी पुण्यात भाजप देणार नवा गडी! मुरलीधर मोहोळांचा पत्ता होणार कट?

sunil deodhar likely to get chance from BJP for Pune Lok Sabha election 2024 murlidhar mohol political news
sunil deodhar likely to get chance from BJP for Pune Lok Sabha election 2024 murlidhar mohol political news

राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणूकीची रणनिती आखण्यात गुंतले आहेत. यादरम्यान पुण्यात लोकसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातच पुणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आणखी एक नवीन नाव पुढे आले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचं नेतृत्व कोण करणार यावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि दिवंगत भाजप नेते गिरीष बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

sunil deodhar likely to get chance from BJP for Pune Lok Sabha election 2024 murlidhar mohol political news
Devendra Fadnavis : अजित पवारांना धक्का! भाजप नेत्यांना दिलासा देत फडणवीसांनी बदलला १५ दिवसांपूर्वीचा 'तो' निर्णय

मात्र आता पुणे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवरक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांचं नाव पुढे आलं आहे. सुनिल देवधर हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. देवधर यांच्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व देखील गंभीररित्या विचार करत असल्याची माहिती आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

sunil deodhar likely to get chance from BJP for Pune Lok Sabha election 2024 murlidhar mohol political news
Mumbai News : CM शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना धक्का! राऊतांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

पुण्यात जन्मलेल्या सुनिल देवधर यांनी १२ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलं आहे. इशान्य भारतात देखील त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाची जबाबदारी देखील देवधर यांनी सांभाळली होती. या निवडणूकीत मोदी यांना विक्रमी मताधिक्याने विजय झाला होता. २०१८ साली भाजपच्या त्रिपुरा येथील विजयात देखील देवधर यांचा मोठा वाटा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com