Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? मंत्रीपदासाठी चढाओढ

दोन देशमुखांबरोबरच आरोग्यमंत्री तानाजी सावंत देखील इच्‍छुक असल्‍याची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक आमदारांची आशा पल्लवित झाल्या आहेत. भाजपकडून आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार की तेच राहणार, याचीही उत्सुकता आहे.(Latest Marathi News)

सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत शहाजी पाटील हे शिंदे सेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनाही राज्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. दुसरीकडे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे.

त्या आमदारांच्या माध्यमातून माढ्याची खासदारकी दुसऱ्यांदा सहजपणे मिळेल, असे भाजपला विश्वास आहे. तसेच माजी मंत्री सुभाष देशमुख यांनाही विस्तारात मंत्रिपदाची अपेक्षा असून त्यांच्या कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे.(Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले होते, ‘सोलापूरच्या बाबतीतील तुमची माया पातळ होऊ देऊ नका’. त्यानंतर त्यांनाही विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा सुरू आहे.

परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला डावलणे भाजपला परवडणारे नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढायची आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदे सेना व भाजपला समान मंत्रिपदे मिळतील, अशी आशा आहे. या विस्‍तारात कोणाच्‍या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची सर्वांनाच उत्‍सुकता लागली आहे.(Latest Marathi News)

पालकमंत्रिपद भाजप की शिंदे सेनेकडे?

जागा वाटपात जिल्ह्यातील माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर उत्तर, बार्शी, पंढरपूर-मंगळवेढा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. सध्या त्या सर्वच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्याठिकाणी अजूनही भाजपचेच पारडे जड आहे.

आता शिंदे सेनेला मिळणाऱ्या मतदारसंघात त्यांना घाम गाळावा लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री शिंदे सेनेचा व्हावा, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. प्रा. तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण, भाजप पालकमंत्रीपद सोडणार नाही हे निश्चित. आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

Latest Marathi News Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ३० तासांनी पूर्ववत

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

सोलापूर विद्यापीठाची २९ सप्टेंबरपासून परीक्षा! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अडीच महिने आधी वेळापत्रक जाहीर, वर्गांत सीसीटीव्ही, ७५ टक्के हजेरीचे बंधन, वाचा...

SCROLL FOR NEXT