हृदयद्रावक घटना! लग्नानंतर आखाडीसाठी बहिणीला आणायला भाऊ निघाला; पण बसमध्ये होरपळून..

बुलढाण्यात (Buldhana) काल एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Buldhana Bus Accident Heartbreaking Story
Buldhana Bus Accident Heartbreaking Storyesakal

वर्धा : बुलढाण्यात (Buldhana) काल एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते.

Buldhana Bus Accident Heartbreaking Story
Cabinet Expansion : नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून कोणाला संधी? शिवसेनेतून 'ही' दोन नावं चर्चेत

यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर (Samruddhi Highway) हा अपघात झाला. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडं जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. दरम्यान, लग्नानंतर आखाडीसाठी बहिणीला आणण्याकरिता गेलेला भाऊ या अपघातात बहिणीपर्यंत पोहोचू शकला नाही.

Buldhana Bus Accident Heartbreaking Story
Buldhana Bus Accident : 'त्यानं' जर आईच ऐकलं असतं तर कदाचित, तो आज जिवंत असता..

करण पुरुषोत्तम बुधबावरे (वय २६) असे या भावाचं नाव आहे. तो झडशी (ता. सेलू) येथील रहिवासी असून तोच घरचा कर्ता होता. त्यामुळं त्याचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. करणच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ते डाक विभागात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी त्याला नुकतीच नोकरी लागली होती. घरचा कर्ता असल्याने आखाडीनिमित्त तो बहिणीला आणण्याकरिता पुण्याला जाणार होता. मात्र, दुर्दैवी घटना घडली.

Buldhana Bus Accident Heartbreaking Story
Kolhapur : दूधगंगा नदी पात्रात आढळल्या 4 मानवी कवट्या; सांगाडा गायब; परिसरात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com