Sharad-Pawar-Sanjay-Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

"पवारांना मी खुर्ची का दिली? जाणून घ्यायचंय..."; राऊतांचा भाजपला सल्ला

भाजपवर केली सडकून टीका

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिल्लीतील एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत स्वत:हून खुर्ची देऊ केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. भाजपच्या नेत्यांनी यावरुन राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. पण आपण असं का केलं याचं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावरुन आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना आपल्या या कृतीमागचं कारण जाणून घ्यायचं असेल तर तु्म्हाला पवारांची ६० भाषणं ऐकली पाहिजेत असा सल्ला दिला आहे.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 'नेमकचि बोलणे' हे खास पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील वरळीत शनिवारी प्रकाशित करण्यात आलं. पवारांच्या गाजलेल्या भाषणांचं संकलन करुन या पुस्तकाच्या रुपानं ती प्रकाशित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, मी खुर्ची बसायला दिली तर सोशल मीडियातून टीका-टिप्पणी झाली. मी पवार साहेबांना खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे तर त्यांची ६० भाषणं वाचली पाहिजेत. हे वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराने, कार्यकर्त्याने त्यांना खुर्ची का दिली? सध्याचं जे विकृत राजकारण सुरु आहे त्यावर पवार साहेबांनी 25 वर्षांपूर्वीच भाष्य केलं आहे. 25 वर्षांपूर्वीच शरद पवार बोलले होते भाजपला देश एकसंघ नकोय, पण आम्हाला हे दोन वर्षापूर्वी कळालं. पवारांनी काही वर्षांपूर्वी भाजप देशाला उलट्या दिशेने नेतोय हे सांगितलं होतं, ते आम्हाला आता कळलं. प्रश्न विचारणाऱ्यांची काय दशा होते हे आपण पाहतोय. आम्ही संसदेत सेंट्रल हॉलमध्ये सगळे भेटायचो पण आता संवाद होता कामा नये म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना बंदी आहे.

पवारांच्या विचाराला भगवं कव्हर घातलं

पवारांच्या पुस्तकाला भगवा रंग यावर संजय राऊत यांनी यावेळी मिश्किल टिप्पणीही केली. पवारांच्या विचाराला भगवं कव्हर घातलं आहे असं ते म्हणाले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे बेरंग नव्हेतर एकमेकांच्या रंगात रंग मिसळत आहेत आता अवघाची रंग एक झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची पाठराखण केली.

पवारांचं पुस्तक पंतप्रधानांना द्यायला हवं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना राऊत म्हणाले, शरद पवार यांचं 'नेमकची बोलणे' हे पुस्तक पंतप्रधानांना द्यायला हवं. 'नेमकची बोलणे' काय आहे हे त्यांना आम्ही फोड करून सांगू. शेवटी शेवटी बाळासाहेब ठाकरेही आम्ही त्यांना वाचून दाखवायचो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : कुंभमेळ्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट; समाधानकारक मोबदला देण्याची मागणी

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT