ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवार म्हणतात, 'निवडणूक बिनविरोध..'

निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील आणि तेही निर्णय घेतील

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपमधून तीन नावांवर चर्चा सुरू आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या लोकसभा पोटनिवडणुकीसंबधी अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

अजित पवार बोलताना म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. रेकॉर्ड पाहिलं तर कमी वेळ शिल्लक असतानाही निवडणुका झाल्या आहेत. पण या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगच निर्णय घेईल. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील आणि तेही निर्णय घेतील. तर मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. तसाच यावेळीही घेतला जाईल, असं पवार यावेळी म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झालीच नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT