Ajit Pawar Not Reachable: अजित पवार नॉट रिचेबल? पक्षातील 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना उधाण

CM शिंदेंच्या आयोध्या अजित पवार नॉट रिचेबेल सोशल मीडियावर चर्चेला उधाण
ajit pawar PDCC Bank
ajit pawar PDCC Bankajit pawar
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यामुळे बड्या बड्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अजित पवार काल सकाळी पुण्यामध्ये होते. त्यानंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विट देखील केले आहे. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोविडमुळे हा नेता महाराष्ट्र बाहेर गेला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. पण सोबत सात आमदार कशासाठी असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे.

ajit pawar PDCC Bank
‘अल निनो’मुळे मान्सून लांबणार? धरणातील पाणी जूनपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार

हे सात आमदार कोण आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण पुणे जिल्हा परिसरातील हे आमदार असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे आणि समर्थकांचा बंड याची पुनरावृत्ती होत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर जात असण्याच्या २४ तास आधीच या घडामोडी घडल्याने त्याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी हा नेता याआधी पण असाच नॉट रिचेबल झाला होता. त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ajit pawar PDCC Bank
Ajit Pawar दौरा रद्द करुन मुंबईत? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; म्हणे ‘रात्र वैऱ्याची आहे’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com