Mumbai News 
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News: वृक्ष कोसळून तरुणाचा मृत्यू, दिवसभरातील दुसरी दुर्घटना

Sandip Kapde

Mumbai News:  मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात देखील मुसळधार पावसामुळे एक वृक्ष घरावर कोसळल्याची दुर्घटना घडली. यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रेमलाल निर्मल असे मयत तरुणाचे नाव आहे. वृक्ष कोसळून व्यक्तींचा मृत्यू होण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोबत जोरदार वारा देखील वाहत असल्याने जुनाट झालेले वृक्ष कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

दुपारच्या सुमारास गोरेगाव एमजी रोड परिसरातील मिठा नगर महापालिका कॉलनीतील एका घरावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बी/22 ए या घरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. (Rain Update News)

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील प्रेम लाल निर्मल याला जवळच्या प्रार्थना रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची ही आज दिवसभरातील दुसरी घटना आहे आज पहाटे देखील मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात कौशल महेंद्र जोशी या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loni Kalbhor drugs crackdown : लोणी काळभोर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात सलग धडक कारवाई; गांजा सेवन करणारे सात जण रंगेहात जेरबंद

CM Baliraja Road Scheme: पेण-सुधागड-रोहा ग्रामीण रस्ते विकासाला गती; ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ समितीचे सह-अध्यक्षपद प्रकाश देसाईंना

Latest Marathi News Live Update : अतिरिक्त दबाव टाकल्यास दुधाचे दर वाढतील आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसेल - संजय निरुपम

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Narayangaon Crime : शेतीच्या कामासाठी जळगाव व नाशिक जिल्ह्यातील 36 शेतमजुरांना ठेवले डांबून; मुकादमावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT