Kiran Mane  sakal
मनोरंजन

Kiran Mane : अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन; आज ठाकरे गटात करणार प्रवेश

Kiran Mane : मराठी अभिनेते आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे किरण माने आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kiran Mane : 'मुलगी झाली हो', 'बिग बॉस मराठी' यासह अनेक मराठी मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. किरण माने नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. मात्र, यावेळी चर्चा आहे ती, त्याच्या राजकारणातील प्रक्षप्रवेशाची.

अभिनेते किरण माने आज हाती शिवबंधन बांधणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात ते आज प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. आज मातोश्रीवरी हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. बीडसह, मराठवाड्यातील काही कार्यकर्ते हे देखील आज पक्षप्रवेश करणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आपल्याला एका वाहिनीतून काढल्याचा माने यांनी आरोप केला होता. आता सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

किरण माने अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात. त्यामुळे ते अनेकदा ट्रोल देखील होतात. आता ते राजकारणात प्रवेश करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT